जळगावात रेल्वेच्या विशेष मोहिमेत दोन लाखांचा दंड वसुल

0

फुकटे प्रवासी रेल्वेच्या रडावर ; 506 प्रवाशांवर केसेस

भुसावळ- तिकीट न काढताच फुकट प्रवास करणार्‍या प्रवाशांविरुद्ध रेल्वे प्रशासनाने 26 रोजी जळगावात केलेल्या कारवाईत 506 केसेसच्या माध्यमातून तब्बल दोन लाख सहा 805 रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली तर फुकट्या प्रवाशांनी कारवाईचा चांगलाच धसका घेतला.

एकाचवेळी 42 निरीक्षकांकडून कारवाई
26 रोजी सकाळी आठ ते दुपारी चार दरम्यान रेल्वे प्रशासनाने राबवलेल्या विशेष मोहिमेत 506 केसेस करण्यात आल्या. विनातिकीट प्रवास करणार्‍या 256 व्यक्तींकडून 96 हजार 850 रुपये दंड, सर्वसाधारण तिकीटावरून स्लीपर डब्यातून प्रवास करणार्‍या 245 प्रवाशांकडून एक लाख नऊ हजार 555 तर लगेचचे तिकीट न काढता प्रवास करणार्‍या पाच प्रवाशांकडून 400 रुपये दंड आकारण्यात आला. सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार याच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 42 तिकीट निरीक्षक व 21 रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी सहभागी झाले. तिकीट चेकिंग स्टाफचे एन.पी.पवार, व्ही.के.भंगाळे, वाय.डी.पाठक, हेमंत सावकारे, प्रशांत ठाकूर, आर.पी.सरोदे, एल.आर.स्वामी व तिकीट कर्मचारी सहभागी झाले.