Dead body of orphaned child found near railway track in Jalgaon: Crime against stranger जळगाव : जळगाव शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाजवळील रेल्वे ट्रॅकजवळ एका शालमध्ये एक महिन्यांचे बालक बेवारसरीत्या मयत आढळले होते. याबाबत मंगळवार, 6 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा
छत्रपती शिवाजी नगरातील रेल्वे उड्डाणपुल तयार होवून नागरीकांसाठी खूला करण्यात आला असून मंगळवार, 30 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास रेल्वे ट्रॅकजवळ अंदाजे एक महिन्यचे बालकाचा बेवारसरीत्या मयत स्थितीत आढळले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक संदीप परदेशी, पोलिस नाईक ललित भदाणे यांच्यासह इतर पोकजस कर्मचार्यांनी धाव घेवून पंचनामा केला. बालकाच्या मृतदेहाजवळ कपडे, औषधी, काळा दोरा, दुध पिण्याची बाटली अश्या वस्तू आढळल्या हेात्या. घटनेच्या आठ दिवसानंतर मंगळवार. 6 सप्टेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात बालकाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार सिध्दार्थ बैसाणे करीत आहे.