जळगावात लाखो रुपये किंमतीचे मद्य जप्त

0
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोजणीला सुरुवात
जळगाव- शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळ एका ट्रकमधून बनावट मद्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर संशयास्पद ट्रकची तपासणी केल्यानंतर त्यात लाखो रुपये किंमतीच मद्य आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटे ही कारवाई करण्यात आल्यानंतर हे मद्य बनावट आहे वा नाही याची तपासणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाचारण करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत मद्याची मोजणी सुरू असल्याने नेमका आकडा सांगता येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील कुराडे व सहकार्‍यांनी ही कारवाई केली. दरम्यान, हे मद्य बनावट आहे वा नाही हे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे कुराडे यांनी सांगितले.