जळगाव:कोरोनाच्या परिस्थितीत हतबल झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व अॅग्रोवर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.१५) पासून तीन दिवसीय तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. इगतपुरी- घोटी येथील अस्सल इंद्रायणी तांदूळ, सांगली येथील सेलम हळद पावडर, तासगावचा बेदाणा व उन्हाळी बाजरी “शेतकरी ते ग्राहक” उपक्रमांतर्गत “ना नफा ना तोटा” तत्वावर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
उन्हाळ्यात अर्थात पावसाळ्यापूर्वी अनेकजण वर्षभरासाठीच्या धान्याची तजवीज करून ठेवतात. परंतु, यंदा कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता सर्व नियम पाळून आलेल्या ग्राहकांसाठी सोशल डिस्टनसिंग, सॅनटाईजची व्यवस्था केलेली आहे. हा महोत्सव रविवारी (दि 17) पर्यंत रोज सायंकाळी 4 ते 6.30 या कालावधीत कृषी विभागाच्या कार्यालयाच्या पटांगणात (आकाशवाणी केंद्राच्या शेजारी) सुरू असेल. या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे अवाहन आयोजकांनी केले आहे. उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांच्या हस्ते झाला. कृषि उपसंचालक अनिल भोकरे आणि आत्माचे प्रकल्प उपसंचालक संजय पवार तसेच अॅग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण आदींची उपस्थिती होती.