जळगावात सातव्या मजल्यावरून पडताच तरुण ठार

Youth dies after falling from seventh floor in Jalgaon जळगाव : शहरातील सुरत रेल्वे गेटनजीक राजमालती नगर परीसरातील सातव्या मजल्यावरुन पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी जळगाव शहरात ही धक्कादायक घडली. कृष्णा सुधीर अहिरे (20, रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, तरुणाला कुणीतरी ढकलून दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेह हलवला
मयत तरुणाचा मृतदेह सामान्य रुग्णालयात सामान्य रुग्णालयात आणला गेल्यानंतर नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात आक्रोश केला. जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. कृष्णा अहिरे याला कुणीतरी इमारतीवरुन ढकलून दिले असून त्याचा घातपात झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.