जळगावात सोन्याच्या दागिन्यांसह रोकडवर चोरट्यांचा डल्ला

Two houses were broken in Nivritti Nagar : 66 thousand compensation was demanded जळगाव : शहरातील जळगाव-धुळे महामार्गावरील निवृत्ती नगरात चोरट्यांनी दोन बंद घरांना टार्गेट करीत 66 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर
जळगाव-धुळे महामार्गावर असलेल्या निवृत्ती नगरातील आसाराम बापू यांच्या आश्रमाजवळ रहिवासी देवेद्नसिंग चंद्रसिंग जाधव (36, रा.कल्याणी होळ, ता. धरणगाव) हे बुक सेलर वास्तव्यास असून घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. 28 ऑक्टोंबर रोजी अनोळखी इसमांनी प्रवेश करीत घरातील सोन्या-चांदीच्या दागिने व रोख रक्कम लांबवली तसेच शेजारी राहणारे गुणवंत प्रेमचंद चौधरी यांच्या घरातूनही 10 हजार 400 रुपयांची रोकड तसेच दिड भाराचे चांदीचे शिक्के, बँक लॉकरची चाबी मिळून 66 हजारांचा मुद्देमाल लांबवला. चोरी प्रकारचा लक्षात आल्यानंतर जाधव यांनी जिल्हा पेठ पोलिस स्थानक गाठत गुन्हा दाखल केला. पुढील तपास हवालदार मनोज बंकट हे करीत आहेत.