जळगाव : जळगाव जिल्हा कारागृहात एका कैद्याकडे मोबाईल आढळून आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताने मोबाईल फेकला
जिल्हा कारागृहाच्या पाठीमागील भींतीवरून एका अज्ञात व्यक्तीने बुधवार, 22 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास मोबाईल जिल्हा कारागृहाच्या कोवीड बॅरेक व 12 नंबर बॅरेकमधील भागात फेकला. फेकलेला मोबाईल न्यायालयीन कैदी असलेला प्रशांत अशोक वाघ याने उचलला. कैदी प्रशांत वाघ हा शुक्रवार, 18 नोव्हेंबर रोजी एरंडोल शहराच्या पुढे भालगाव फाटा येथे जवानाला चाकूचा धाक दाखवून लुटून नेणार्या चार लुटारूतील एक आहे. कैदी प्रशांत वाघ यांच्याकडे मोबाईल सापडल्यानंतर जेल कर्मचार्यांनी मोबाईल जप्त केला. जेल शिपाई बुढन भिकन तडवी (37, रा.जळगाव जिल्हा कारागृह) यांच्या फिर्यादीवरून कैदी प्रशांत अशोक वाघ यांच्यासह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक जयंत कुमावत करीत आहे.