Kisanrao Najan-Patil as Inspector-in-charge of Jalgaon Crime Branch जळगाव : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे निलंबन करण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी कोणाची वर्णी लागणार ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. जळगाव गुन्हे शाखेच्या प्रभारी निरीक्षकपदी पाचोऱ्याचे निरीक्षक
किसनराव नजन-पाटील यांची तात्पुरता नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी नुकतेच काढले आहेत.
नियमित नेमणूक होईपर्यंत नियुक्ती
पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक किसन लक्ष्मण नजन, पाचोरा पोलीस ठाणे हे वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव या पदाचा अतिरिक्त कार्यभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव या पदाचे नियमित नेमणुक आदेश होईपावेतो त्यांचा मुळ नेमणुक पाचोरा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी या पदाचे कामकाज सांभाळून पाहतील. दरम्यान, किसनराव नजन-पाटील हे डॅशिंग अधिकारी म्हणून जिल्ह्याला परिचित आहेत. तसेच स्वभाव शांत आणि कायद्याचे भोक्ते असल्यामुळे हा पदभार त्यांच्याकडे कायम ठेवला जाण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. जळगाव जिल्ह्यात आल्यानंतर जळगाव शहर, चोपडा, भुसावळ, पाचोरा पोलीस स्थानक असा नजन पाटील यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ राहिला आहे.