जळगाव: जनता बँक कर्मचारी गणेश मंडळ मागील २६ वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करीत आहे. या वर्षी आपल्या देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या अनुषंगाने पोखरण येथील अणुस्फोटावर आधारित भव्य देखाव्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या सोबतच सध्या डिजिटल व्यवहार जनजागृती करण्याच्या अनुषंगाने बँकेने नुकतीच डिजिटल व्यवहार प्रोत्साहन मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे सदर मोहीम १५ ऑगस्ट २०१८ ते १५ जानेवारी २०१९ या काळात सुरु राहणार आहे.
यात ग्राहकांना जास्तीत जास्त डिजिटल व्यवहारांवर आकर्षक बक्षीस देखील दिले जाणार आहे याच अनुषंगाने गणेशोत्सव काळात डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित कसे करावेत याबाबत समाजप्रबोधन देखिल करण्यात येणार आहे. मंडळातर्फे गणेशोत्सवात विविध भागातून निर्माल्य संकलनाचे काम करण्यात येते. जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळाची नुकतीच बैठक झाली असून त्यात या वर्षीची कार्यकारणी व समित्यांची स्थापना करण्यात आली. सल्लागार समिती : सर्वश्री अनिल राव,डॉ.प्रताप जाधव, भरत अमळकर, दीपक अट्रावलकर, रविंद्र बेलपाठक, सतीश मदाने, जयंतीलाल सुराणा, विवेक पाटील, सुरेश केसवाणी, सुभाष लोहार, हरिश्चंद्र यादव,डॉ.अतुल सरोदे, डॉ.आरती हुजूरबाजार, सावित्री सोळून्खे, पुंडलिक पाटील, रत्नाकर पाटील, संजय नागमोती, सुनील अग्रवाल, बापूसाहेब महाले, ओंकार पाटील, हेमंत चंदनकर, चंन्द्रशेखर संत. कार्यकारणी : अध्यक्ष राजेश महाजन ,उपाध्यक्ष दिनेश ठाकरे व भास्कर साळुंखे ,सचिव अनिल देशमाने,सहसचिव योगेश चोपडे,कार्याध्यक्ष कपिल चौबे १३ सप्टेंबर २०१८ पासून सुरु होणा-या गणेश उत्सवात भाविकांनी देखाव्यास अवश्य भेट द्यावी व च्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.