ट्रायने लागू केलेले दर रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
जळगाव – टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडीयाने (ट्राय)ने २९ डिसेंबर २०१८ पासून नवीन कायदा आमलात आणला जाणार आहे. मात्र का कायदा एकतर्फी असून यात ट्राय आणि ब्रॉडकास्टर यांची मनमानी करत आहे. केबलधारक व ग्राहकांना विश्वासात न घेता सध्याच्या दरापेक्षा ट्रायचा दर पाच पटीने असल्याने हे परवडणारे नसल्याने जळगाव जिल्हा केबल चालक मालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत ट्रायने केलेल्या दराची अंमलबजावणीचा निषेध करत हा कायदा त्वरीत रद्द करावा अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.