जळगाव जिल्हा बँकेत रीपाइं गटाला एक जागा द्यावी
अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढवणार : रीपाइं आठवले गटाचा भुसावळात इशारा
भुसावळ : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत रीपाइं आठवले गटाला एक जागा मिळावी अन्यथा जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्यात येईल शिवाय आगामी काळात नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परीषद, पंचायत समिती आदी सर्व निवडणूका स्बबळावर लढवण्यात येतील, असा इशारा रीपाइं आठवले गटाचे युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र सपकाळे, खान्देश प्रभारी अध्यक्ष लक्ष्मण जाधव आदींनी बुधवारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परीषदेत दिला.
अन्यथा निवडणूक स्वबळावर : रवी सपकाळे
रीपाइं आठवले गटाची भाजपासोबत युती असलीतरी जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत सर्वपक्षीय बैठकीत रीपाइंला निमंत्रण देण्यात आले नाही मात्र आता रीपाइंला किमान एक तरी जागा मिळावी, अशी आमची मागणी आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास वा जागा न सोडल्यास सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने जिल्हा बँकेची निवडणूक रीपाइं आठवले गट स्वबळावर लढवेल, असे पत्रकार परीषदेत युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र सपकाळे यांनी सांगितले. याबाबत माजी मंत्री गिरीष महाजन, जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, खान्देश प्रभारी अध्यक्ष लक्ष्मण जाधव व सर्व पदाधिकारी पत्र देवून चर्चा करणार आहे. यावेळी खान्देश प्रभारी अध्यक्ष लक्ष्मण जाधव, जिल्हा पदाधिकारी पप्पू सुरळकर, जिल्हा उपाध्यक्ष शरद सानेवणे, तालुकाध्यक्ष बाळू सोनवणे, विश्वास खरात, सुनील ढिवरे, गोरख सुरवाडे आदी उपस्थित होते.