भुसावळचे आणखी २ कोरोना पॉझिटिव्ह

0

जळगाव: येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी दोन व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. या दोन्ही व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

या दोन्ही व्यक्ती भुसावळ च्या असून यात 42 वर्षीय पुरूष व 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 43 इतकी झाली आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे.