जळगाव : जळगाव तालुका पोलिसांनी जुगारासह गावठी दारू विक्री करणार्यावर कारवाई केली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव तालुका हद्दीतील ममुराबाद गावातील बसस्थानकाजवळ संशयीत आरोपी प्रवीण श्रावण पाटील जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाई करीत मुद्देमाल जप्त केला तर धानोरा-दापोरा रस्त्यावरून दुचाकीवरून दारूची चोरटी वाहतूक करताना सुभाष गणेश भिल यास पकडण्यात आले. संशयीताच्या ताब्यातून दोन ड्रममधील 60 लिटर तयार दारुसह दुचाकी मिळून 30 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जळगाव तालुका पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.