जळगाव : जळगाव तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गुंगीचे औषध दिल्यानंतर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली असून आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अटक केली आहे. साबीर शेख जहूर (26) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
पाण्यातून दिले गुंगीचे औषध
जळगाव तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून गावातील संशयीत आरोपी साबीर शेख जहूर (26) याने ओळखीचा गैरफायदा घेवून 1 ऑगस्ट 2021 ते 30 सप्टेंबर 2021 दरम्यान अल्पवयीन मुलीला घरी बोलावत पाण्यातून गुंगीचे औषध देवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीने आपल्या नातेवाईकांसह एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी संशयीत आरोपी साबीर शेख जहूर याच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहे.