जळगाव । शहरातील मेहरुण दत्तनगर पिरजादे वाड्यातील अठरा वर्षीय तरुण नावेद अख्तर पिरजादे याच्या खुनाच्या घटनेला तीसरा दिवस उजाडला. रात्री दहा वाजेपर् परिसरातच असलेल्या नावेदला मारेकर्यांनी रिक्षा किंवा दुचाकीने बसवुन शिरसोली रोडवरुन नेल्याचा पोलिसांचा कयास असुन त्या दृष्टीने सीसीटीव्ही फुटेज संकलीत करुन संबधीत वाहन धारकांची माहिती काढण्यात येवुन चौकशी सुरु होती. दरम्यान पोलिसांच्या ताब्यातील संशयीतांना आजही कसुन चौकशी करण्यात आली.
कॉलडिटेल्स तपासणे सुरू
मेहरुण येथील नावेद अख्तर शकिबुद्दीन पिरजादे (वय-18) या तरुणाचा शुक्रवार (ता.16 )रोजी खुन करण्यात आला. रात्री साडे दहा ते बारा वाजेच्या दरम्यान अज्ञात मारेकर्यांनी नोवेदचा गळा आवळून गुप्ती सारख्या हत्त्याराने गळ्यावर भोसकुन हत्त्या करण्यात आली आहे. रात्री साडेआठ पर्यंत घरा जवळील फातिमा मशीद जवळ आणि त्यानंतर सव्वा दहा पर्यंत नावेद चटोरीगल्लीत होता. तदनंतर मात्र तो गायब झाला व दुसर्या दिवशी त्याचा मृतदेहच मिळून आला. नावेदला मेहरुण परिसरातून जळगाव-पाचोरा रोडने घेवुन जात अकाशवाणीच्या मागील बाजुस पश्चिम भिंतीच्या दिशेने खुन करण्यात आला आहे. नावेदला मेहरुण ते शिरसोली पर्यंत ज्या वाहनाने नेण्यात आले त्या वाहनाचा पोलिस शोध घेत असुन शिरसोली नाका परिसरातील डिमार्ट पासुन ते थेट गावा पर्यत असलेल्या वेगवेगळ्या जवळपास 35 सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज शोधण्याचे काम सुरु आहे. नावेदच्या मिळून न आलेल्या मोबाईल मध्ये दोन सिमकार्ड होते आणि घरी मिळून आलेल्या मोबाईल मधील जुना मोबाईल नंबर अशा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या नंबरवर आलेले व गेलेले कॉल्सची तपासणी पोलिस करीतआहे.
एकच कॅमेरा उपयोगी
जळगाव ते शिरसोली दरम्यान तब्बल तीस ते पस्तीस ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याचे आढळते, मात्र त्यातही प्रचंड अडचणी येत आहे, बहुतांश कॅमेरांना नाईट व्हिजन नाही. एका ठिकाणी पोलिसांना घटनेच्या रात्रीचे फुटेज मिळाले असुन त्यात दिसत असल्या प्रमाणे वाहनांची व त्या वाहन धारकांना विचारपुस चौकशी करण्यात येत आहे.