जळगाव पीपल्स बँकेच्या दिनदर्शिका 2018 च्या वितरणास प्रारंभ

0

जळगाव : दि जळगाव पीपल्स को-ऑप बँक आपल्या सभासदांसाठी विविध कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत दरवर्षी दिनदर्शिका छापून वितरण करीत असते. यावर्षी देखील बँकेने बँकेत उपलब्ध असलेल्या विविध सेवा सुविधांची संकल्पना घेवून दिनदर्शिकेची रचना केली असून या दिनदर्शिकेचा शुभारंभाचे माननीय अतिथी गोविंद महाजन, डॉ.अनिल खडके, कंवरलाल संघवी, अशोक बेदमुथा, भागवत भंगाळे, अशोक शिंदे, सुनिल वामनराव खडके, सुनिल अरविंद नारखेडे व डॉ.प्रिती अग्रवाल यांच्याहस्ते बँकेच्या दिनदर्शिकेचा वितरण शुभारंभ करण्यात आला.

दिनदर्शिका वाटप 29 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान
चेअरमन भालचंद्र पाटील यांनी प्रास्ताविकात बँकेचे माननीय सभासद, ग्राहक व शुभचिंतक यांनी सदैव दिलेल्या पाठींब्याबद्दल आभार मानले. बँक कल्याणकारी योजना राबवित असते. सभासदांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. गोविंद महाजन सर म्हणाले की, यांनी बँकेच्या उपक्रमाबद्दल आणि प्रगतीबद्दल बँकेचे कौतुक केले. डॉ.प्रिती अग्रवाल,.अशोक शिदे, कंवरलाल संघवी व अशोक बेदमुथा यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास मान्यवर अतिथींसोबत बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, व्हा.चेअरमन डॉ.प्रकाश कोठारी, संचालक दादा नेवे, प्रा.विलास बोरोले, अनिकेत पाटील, चंदन अत्तरदे, रामेश्‍वर जाखेटे, प्रबंध संचालक व सीइओ अनिल पाटकर आदी मान्यवर तसेच बँकेचे सभासद व ग्राहक मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती मिनासे यांनी केले. दिनदर्शिका वाटप दि.29 नोव्हेंबर ते दि.31 डिसेंबर 2017 पर्यंत सोमवार ते शुक्रवार सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 या वेळेत (सुटीचेदिवस वगळून) उपलब्ध आहे.