जळगाव । दि जळगाव पीपल्स को-ऑप बँक उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य मल्टिस्टेट शेडयुल्ड बँक आहे. 84 वर्षांच्या उज्वल परंपरेत बँकेस अनेक पुरस्कारांनी व सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. सदर पुरस्कारांमध्ये आणखी एक सन्मान बँकेस प्राप्त झाला आहे. रविवार 26 फेब्रुवारी 2017 रोजी सहकार सुगंधतर्फे नागरी सहकारी बँका व पतसंस्थांसाठी आयोजित प्रतिबिंब या राज्यव्यापी वार्षिक अहवाल स्पर्धा 2016 मध्ये उत्तर महाराष्ट्र (नागरी बँका) विभागातून आपल्या जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेस प्रथम क्रमांक प्राप्त झाला. सदर पुरस्कार विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या शुभहस्ते बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील व संचालक मंडळ यांनी स्विकारला.
सदर कार्यक्रमास ओमप्रकाशजी (काका) कोयटे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या.), किशोर शितोळे (उपाध्यक्ष, देवगिरी नागरी सह. बँक मर्या) यांची विशेष उपस्थिती लाभली. सदर कार्यक्रम औरंगाबाद येथे भव्य समारंभात संपन्न झाला. वार्षिक अहवाल हा बँकेच्या कार्याचा आरसा आहे. बँकेची उत्कृष्ट कार्यशैली सुंदर रचना व माहितीने परिपूर्ण पद्धतीने मांडण्यात आली आहे. आपला अहवालसुद्धा बँकेचे अंतरंग स्पष्ट करणारा, सभासदांच्या रास्त भावनांना प्रतिसाद देणारा, सहकाराचे आणि रिझर्व बँकेचे दिशानिर्देश पाळणारे असे अहवालाचे स्वरुप प्रकट करणारा, बँकेच्या वार्षिक ताळेबंदाचा आलेख दर्शविणारा तसेच बँकेचे पारदर्शी कार्यपद्धती दर्शवित अहवाल 2015-16 चे सुयोग्य प्रकटीकरण केले जाते.
बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील यांचे बँकेच्या प्रत्येक कार्यात घडामोडीत बारकाईने व आस्थेवाईक पद्धतीने लक्ष देत असतात, याचे प्रत्यंतर वार्षिक अहवाल पुरस्काराव्दारे येते. सदर कार्यक्रमास बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, संचालक दादा नेवे, प्रा.विलास बोरोले व अनिकेत पाटील तसेच बँकेचे जनसंपर्क अधिकारी गोविंद खांदे, हुडको शाखाधिकारी संजय राणे उपस्थित होते.
कार्यक्रमात यांची होती उपस्थिती
सदर कार्यक्रमाच बँकेचे जनसंपर्क अधिकारी गोविंद खांदे, संचालक दादा नेवे, हुडको शाखाधिकारी संजय राणे, सहकार सुगंध संपादक भालचंद्र कुलकर्णी, बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, संजय बिर्ला, हरिभाऊ बागडे, बँकेचे संचालक अनिकेत पाटील, प्रा.विलास बोरोले, ओमप्रकाशजी (काका) कोयटे व किशोर शितोळे.
यांच्यासह सभासद वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होते.