जळगाव पुन्हा चोरट्यांनी बाईक लांबवली

जळगाव : शहरातील मु.जे.महाविद्यालय परीसरातील पटांगणात पार्किंगला लावलेली व्यापार्‍याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
शशीकांत सुभाष पाटील (32, रा.जाकीर हुसेन सोसायटी, संत गाडगेबाबा, नगर महाबळ, जळगाव) हे व्यापारी असून शनिवार, 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता एम.जी.कॉलेज परीसरात असलेल्या केसीई सोसायटीच्या पटांगणात त्यांनी त्यांची दुचाकी (एम.एच.19 डी.व्ही.0028) पार्किंग करून लावली असताना चोरट्यांनी 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. शशीकांत पाटील यांनी सोमवार, 21 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक प्रवीण जगदाळे करीत आहे.