जळगाव : शहरातून जाणार्या एशियन हायवे -क 46 ,(राष्ट्रीय महामार्ग 6)शी संबंधित विविध समस्यांकडे पोलिस, मनपा, आरटीओ आणि नैशनल हायवे थोरिटीचे लक्ष वेधण्यासाठी शिव कॉलनी चौकात सकाळी 9:30 वाजेपासून नागरिकांची सह्यांची मोहिम सुरु करण्यात येणार आहे. या महामार्गावरील अतिक्रमण, वाढते अपघात व दुरावस्थेविषयी सर्व पक्षिय शिष्टमंडळाने काल जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे तक्रार केली आहे.
समान्तर रस्ते लवकर विकसित करावे,साइडपट्टया,खड्डे दुरुस्त करावेत,महामार्ग चौपदरी करणाचे काम लवकर सुरु व्हावे ही नागरिकांची अपेक्षा आहे. हाच मुद्दा उचलून जळगाव फर्स्ट ह्या अराजकिय व्यासपिठ व दिव्यमराठी यान्च्या सयुक्त विद्यमानाने उद्या, बुधवारी सकाळी शिवकॉलनी चौकात नागरिकांच्या वतिने सह्यांची मोहिम राबवून महामार्गावर सुरक्षित वाहतुकीशी संबंधित मागण्या केल्या जातील. जळगाव शहरातून जाणार्या या महामार्गावर दरवर्षी शेकडो जणांना जीव गमवावा लागतो. यात कुटुंबाचा एकुलता एक आधार , कुटुंबाचा कर्ता, वृध्दांचा आधार, बहिणीचा भाऊ, नवविवाहीतेचा पती, कुटुंबाचा लाडका अशा प्रकारे मुला – मुलींना जीव गमवावा लागतो. महामार्गावरील अपघात कमी होण्यासाठी,समान्तर रस्ते विकसित करणे, रस्ता सुरक्षा व दुरुस्तीकडे लक्ष देण्याच्या मागणीसाठी सह्यांची मोहिम आहे. ही मोहिम पक्ष विरहीत असून कोणत्याही पक्ष, संघटना, युवक युवती, पालक, प्रौढ व ज्येष्ठांनी या सह्यांच्या मोहिमेत सहभाग घ्यावा असे आवाहान जळगाव फर्स्ट संघटनेचे प्रणेते डॉ. राधेशाम चौधरी यांनी केले आहे.