जळगाव मध्ये आनंदमेळा ; शिवलिंगाचे खास आकर्षण

0

जळगाव। देश विदेशातील करोडो भारतीयांचे श्रद्धास्थान असणार्या जगप्रसिद्ध श्री अमरनाथ येथील शिवलिंगाचा भव्य देखावा सादर करण्यात आला असून जळगावकर नागरिकांना दर्शनाचा लाभ घेता येणार असल्याची माहिती मनोरंजन नगरीचे संचालक यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. यावेळी मनोरंजन नगरीचे उद्घाटन बेटी बचाव, बेटी पढाओ या अभियानाला डोळ्यासमोर ठेवून श्रृती शर्मा या चिमुकलीच्याहस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी आयोजक संतकुमार गुप्ता ,मुख्तार खाटीक आदी उपस्थित होते.

शिवलिंगाचे खास आकर्षण: जगप्रसिद्ध बाबा श्री अमरनाथ शिवलिंगाचे दर्शन अनेकांना घेता येत नाही. मात्र मनोरंजन नगरीतर्फे दहा पुटी भव्य अशा शिवलिंगाचा देखावा शिवतीर्थ मैदानात उपलब्ध करून दिला असून आनंद मेळाव्याला दररोज येणार्या हजारो नागरिकांना बाबा अमरनाथ यांच्या शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. यासाठी खास व्यवस्था असून हुबेहुब पहाड, त्रिवेणी संगम व शिवलिंगाची प्रतिमा तयार करण्यात आली आहे. 200 कर्मचारी आनंदमेळा च्या आयोजनामध्ये काम करीत असल्याची माहिती देण्यात आली.

विविध खास खेळणी: खास लहान मुलांचे मनोरंजन होण्यासाठी मनोरंजन नगरीत विविध खेळणी ठेवण्यात आली असून यामध्ये ब्रेक डान्स, आकाश झुला, सोलॅम्बो, टोराटोरा, ड्रॅगन ट्रेन, मोनीबाका, वॉटर बोट, जम्पिंग, वॉटर बलून, मौत का कुंवा, क्रॉस झुला, जहाज आदी खेळणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच याशिवाय येथे येणार्या नागरिकांना खरेदीसाठी विविध वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले आहे. याशिवाय खवय्यांसाठी खानपानची दुकाने उपलब्ध करून देण्यात आली आहे. मनोरंजन नगरीचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.