जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी अधिकार्‍यांची नियुक्ती

0

महानगरपालिका आयुक्तांनी काढले आदेश ; 1 ऑगस्ट रोजी निवडणूक

जळगाव- महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे. 28 रोजी महानगरपालिका आयुक्तांनी निवडणुकीसाठी जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच अन्य अधिकार्‍यांची सहाय्यक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. एकूण 18 प्रभागांसाठी ही अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून 1 ऑगस्ट रोजी निवडणूक होत आहे.

प्रभागनिहाय नियुक्त झालेले अधिकारी व सहा.अधिकारी असे-
प्रभाग एक ते तीन- रोहयो उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, सहा.अधिकारी जामनेर तहसीलदार नामदेव टिळेकर, सहा.नगर रचनाकार भास्कर भोळे, कनिष्ठ अभियंता विलास पाटील, प्रभाग चार ते सहा- एरंडोल प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, सहा.अधिकारी धरणगाव तहसीलदार चंद्रजीत राजपूत, शाखा अभियंता संजय नेवे, कनिष्ठ अभियंता प्रसाद पुराणिक, प्रभाग सात, 11 व 12- विशेष भूसंपादन अधिकारी रामसिंग सुलाने, सहा.अधिकारी पाचोरा तहसीलदार बंडू कापसे, अन्न, भेसळ निरीक्षक एस.व्ही.पांण्डेय, कनिष्ठ अभियंता सुनील तायडे, प्रभाग आठ ते दहा- पाचोरा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार राहुल जाधव, शाखा अभियंता ईस्माईल शेख, कनिष्ठ अभियंता पंकज पाटील, प्रभाग 13 ते 15 व 19- फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, सहा.अधिकारी यावल तहसीलदार कुंदन हिरे, रचना सहाय्यक भागवत पाटील, कनिष्ठ अभियंता मनोज वन्नेरे, प्रभाग – 16 ते 18- अमळनेर प्रांताधिकारी संजय गायकवाड, सहा.अधिकारी जळगाव तहसीलदार अमोल निकम, शाखा अभियंता मिलिंद जगताप, शामकांत भांडारकर