जळगाव- प्रभाग क्रमांक सातमधील चारही जागांवर भाजपाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. विजयी उमेदवारांमध्ये अ मधून आमदार राजू मामा भोळे यांच्या पत्नी सीमा सुरेश भोळे, ब मधून दीपमाला काळे, क मधून अश्विन सोनवणे व ड मधून सचिन पाटील यांनी विजयश्री खेचून आणली. दरम्यान, प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये मंगला चौधरी या विजयी झाल्या आहेत.