जळगाव- भाजपने विजयाची घौडदौड कायम राखली असून प्रभाग क्रमांक 14 मध्येही चारही जागांवर बाजी मारली आहे. या प्रभागात अ मधू रेखा पाटील, ब मधून सुरेखा सोनवणे, क मधून सदाशिव ढेकळे, ड मधून राजेंद्र पाटील हे विजयी झाले आहे. यात सदाशिव ढेकळे हे सलग नव्यांना विजयी झाले आहेत. ड मधून विद्यमान पृथ्वीराज सोनवणे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सोनवणे हे भाजपचे नगरसेवक होते पण भाजपाने यावेळी उमेदवारी नाकारल्याने ते शिवसेनेकडून उभे होते.