जळगाव महापालिका निवडणूक : पहिल्या चार तासात 13.32 टक्के मतदान

0

जळगाव- जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी 11.30 पर्यंत सरासरी 13.32 टक्के मतदान झाले. जळगाव मनपा निवडणुकीच्या 75 जागांसाठी 303 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 9 पक्ष निवडणूक लढत आहेत. मात्र भाजपा व शिवसेनेत या निवडणुकीत सरळ लढत होत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी यांनी झांबरे शाळेत मतदानाचा हक्क बजावला.