जळगाव- प्रभाग 19 मध्ये तीनही जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. त्यात दोन अधिकृत तर एक पुरस्कृत उमेदवार आहेत. शिवसेनेचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा हा वॉर्ड म्हणून ओळखला जातो. विजयी झाल्यांमध्ये आमदार सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे यांचा समावेश आहे. या प्रभागाच्या भौगोलीक क्षेत्रामध्ये आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा पुर्वीचा मोठा भाग समाविष्ट होता. आमदार सोनवणे यांचा सुरूवातीपासून या भागात प्रभाव होता. कृषी उत्पन्न बाजार समितीशी निगडीत बहुसंख्य मतदार या प्रभागाशी निगडीत असल्याने आमदार सोनवणे यांचे वडील बळीरामदादा सोनवणे हे कृउबाचे पाच वर्ष सभापती असल्याने त्यांचा संपर्क दांडगा होता व सोबतचे निवडून आलेले उमेदवार हे स्थानिक होत. या सर्व बाबी या प्रभागात शिवसेनेच्य विजयासाठी पोषक ठरल्या आहेत.