जळगाव रनर्सच्या प्रेमलता सिंग जालना मॅरॅथॉनमध्ये तृतीय

0

जळगाव । जालना येथे रविवारी संपन्न झालेल्या पहिल्या जालना मॅरेथॉनमध्ये जळगाव रनर्स ग्रुपच्या प्रेमलतासिंग यांनी 2 तास 33 मिनिटात हॉफ मॅरेथॉन पूर्ण करून त्रीतीय स्थान पटकाविले. या सोबत डॉ.विवेक पाटील (2तास 7मिनिटे), डॉ.प्रशांत देशमुख (2तास 22मिनिटे), डॉ.नीरज अग्रवाल (10की.मी.,95मिनिटात ) यांनी सुद्धा हॉफ मॅरेथॉन पूर्ण केली तसेच रायसोनी महाविद्यालयच्या प्राचार्य प्रीती अग्रवाल यांनी सुद्धा 5 किलोमीटरची रन पूर्ण केली.

यांचा सहभाग
जळगाव रनर्स ग्रुप मुळेच शक्य झाले आहे, त्यामुळे सर्वांचे आभार व सर्व महिलांनी खान्देश रनमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रेमलतासिंगने सांगितले. जळगावात सुद्धा असाच प्रकारची टाटा ए.आय.जी खान्देश रनचे आयोजन 10 डिसेंबर रोजी सागर पार्क येथे रनर्स ग्रुपतर्फे करण्यात येत आहे, सर्व जळगावकरानी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आयोजकांच्यावती करण्यात आले आहे.