जळगाव । देशात व जगात शांतता प्रस्थापित होऊन हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये जातीय सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत होऊन एकोपा राहावा, असे मत आज जळगाव रेल्वे स्थानकावर आयोजित ईफ्तार पार्टीला उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून रेल्वेत व रेल्वे स्टेशनवर चहा, नाश्ता विक्री करणार्या हॉकर्स बांधवांतर्फे रेल्वे स्थानकावर रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन गुरूवारी 22 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास रोजा सोडण्याच्यावेळी केले.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी पवन एक्सप्रेस व कामयानी एक्सप्रेसमधील रोजेदार मुस्लिम बांधवाना रोजा सोडण्यासाठी फळे, मिष्ठान्न, पाणी व फराळाचे वाटप यावेळी करण्यात आले. ईफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाला शिवचरण ढंढोरे, शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे, आरपीएफचे पोलीस निरीक्षक गोकुळ सोनवणे, उपनिरीक्षक वायके शर्मा, एएसआय समाधान वाघूळकर, एजाज लाला, निलेश अडवाल, अलीमभाई, आरपीएफचे सुनील बोरसे, रियाज सैय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जावेद लाला, शब्बीर लाला, नाजीम लाला, शेख सादिक शेख इब्राहिम, ज्ञानेश्वर वाघ, राहुल वाघ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.