जळगाव रेल्वे स्थानकावर अनोळखीचा दीर्घ आजाराने मृत्यू

0

भुसावळ- जळगाव रेल्वे स्थानकावरील खांबा क्रमांक 419/10-18 वर अप लूप लाईनवर 60 वर्षीय अनोळखी इसमाचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी साडेसात वाजेपूर्वी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी ऑनड्युटी डीवायएसएस यांनी लोहमार्ग पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताचा चेहरा गोल, दाढी-मिशी वाढलेली, पांढर्‍या रंगाचा पायजामा असे वर्णन आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तपास हवालदार दामोदर सोळंखे करीत आहेत.