जळगाव शहरातील प्रौढाची आत्महत्या

जळगाव : निमखेडी शिवारातील मयूर सोसायटीत 55 वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विठ्ठल आप्पा पाटील (55, रा.निमखेडी शिवार, मयूर हौसिंग सोसायटी, जळगाव) असे मयताचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
विठ्ठल पाटील यांच्या पत्नी सोमवार, 10 जानेवारी तालुक्यातील कानळदा येथे भावाकडे कार्यक्रमानिमित्ताने गेल्या असताना घरात कुणी नसताना मंगळवारी त्यांनी गळफास घेतला. आत्महत्या करण्याचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. हा प्रकार शेजारचांच्या लक्षात आला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार अनिल फेगडे करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परीवार आहे.