जळगाव शहरासह भुसावळात सहा कोरोना बाधित रूग्ण आढळले; एकूण रुग्ण ३८८

0

जळगाव – जिल्ह्यातील भुसावळ व जळगाव येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 276 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 272 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सहा व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगावच्या शिवाजी नगरातील एका व्यक्तीचा तर भुसवाळ येथील पाच व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 388 इतकी झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.