जळगाव शहरासह भुसावळ अमळनेरात 7 ते 13 जुलैपर्यंत लॉकडाऊन !

0

जळगाव- गेल्या काही दिवसांपासून जिल्हयात कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. कोरोनाबाधीतांचा आकडा 4007 वर पोहचला आहे. अनेक लोकप्रतिनिधींसह संघटनांकडून गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनची मागणी समोर येत होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगाव शहर महानगरपालिका, भुसावळ आणि अमळनेर नगरपालिका क्षेत्र या ठिकाणी दि. 7 जुलैच्या पहाटे 5 वाजेपासून ते 13 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात औषधी दुकाने, दुधविक्री, खरेदी करता येणार आहे. कोणत्याही स्वंयचलित वाहनाचा या कालावधीत वापर करता येणार नाही.

जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्र, भुसावळ नगरपालिका क्षेत्र,अमळनेर नगरपालिका क्षेत्रात 7 जुलै ते 13 जुलैपर्यंत लागू होणार्‍या लॉकडाऊनची नियमावली

ही सेवा राहील बंद

रेल्वे, बस, विमान सेवा   जिल्ह्यांतर्गत प्रवास वाहतूक  टॅक्सी, कॅब रिक्षा  चारचाकी वाहने (अत्यावश्यक वैद्यकीय सेवेची गरज वगळून)
शैक्षणिक संस्था  भाजीपाला / फळे खरेदी विक्री केंद्रे  धार्मिक स्थळे, सभा, मेळावे, बैठका, औद्योगिक आस्थापना (एमआयडीसी वगळून) शासकीय, खाजगी (मान्सून पूर्व कामे वगळून) बांधकामे,  शॉपींग मॉल्स, मार्केट, किराणा दुकान, लिकर शॉप,  बार्बर शॉप, स्पा, सलून खाजगी कार्यालये,  कुरीअर, इलेक्ट्रीशिअन, प्लंबर, गॅरेज वर्कशॉप  अत्यावश्यक सेवा नसलेले इतर सर्व दुकाने,   गार्डन, पार्क, बगीचे.

ही सेवा असेल सुरू
हॉटेल, रेस्टॉरट पार्सल सुविधा  मेडीकल स्टोअर्स,  ओपीडी  दुध खरेदी- विक्री केंद्रे,  कृषी संबंधित कामे  कृषी सेवा केंद्रे  शासकीय कार्यायले,  बँका व वित्तीय संस्था, पोस्टल सेवा,