भुसावळ- जळगाव शहर उपविभागाचे डीवायएसपी सचिन सांगळे यांची लातूर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रीक्त पदावर इचलकरंजी उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निलभ रोहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी सोमवारी सहा पोलिस उपअधीक्षक/सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश काढले. अन्य बदली झालेल्या अधिकार्यांमध्ये नियुक्तीच्या प्रतीक्षेतील गणेश बिरादार यांची इचलकरंजी उपविभागीय अधिकारीपदी, नांदेड जात पडताळणीचे अनिल पवार यांची मिरज उपविभागीय अधिकारीपदी, मिरज उपविभागाचे राहुल मदने यांची संगमनेर उपविभागीय अधिकारीपदी तसेच संगमनेर उपविभागाचे अशोक थोरात यांची शिर्डी उपविभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारीपदी बदली करण्यात आली.