जळगाव । लायन्स क्लब जळगाव सेंट्रल व आस्था प्लास्टीक सर्जरी सेंटर जळगाव यांच्यातर्फे प्लास्टीक सर्जरी कॅम्पचे आयोजन रविवार 11 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. या शिबिरात आर्थिक सहयोग लायन्स क्लब जळगाव सेंट्रलचे सर्व सदस्य व सुनिल मंत्री कांतीलाल कोठारी, जयेश ललवानी यांचे सहयोग लाभले.
आस्था प्लास्टिक सर्जरी सेंटरचे सहकार्य
या शिबिरात जळीत 25 रुग्णांनी आपले नाव नोंदविले व त्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी मोफत ऑपरेशनसाठी योग्य व आवश्यक रुग्णांची निवड कमिटीद्वारा करण्यात आली. त्यातून 14 रुग्णावर अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. जसे ज्या रुग्णांना जळाल्यानंतर होणार्या विकृती उदा. मान, हात, पाय, बोटे इत्यादी आकसणे व त्यामुळे त्यांच्या दैनंदिन कामाच अडचणी येतात, अशा रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार अहे. या शस्त्रक्रिया 6 महिन्यापर्यंत चालेल, तसेच या सर्व शस्त्रक्रिया डॉ.शिरीष चौधरी हे करणार आहेत. लायन्स क्लब जळगाव सेंट्रलच्या माध्यमातून अशा प्रकारच्या रुग्णांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात पुन: आणण्याचा प्रयत्न केला. लायन्स क्लबतर्फे जळीत रुग्णाची रक्त लघवी तपासणी तसेच शस्त्रक्रिया व रुग्णांसोबत एका व्यक्तीची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात येते. या प्रसंगी चेअरमन शिरी सिसोदीया, झोन चेअरमन रितेश छोरिया यांची विशेष उपस्थिती होती.