आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते झाले उद्घाटन
अमळनेर – तालुक्यातील जवखेडा येथे विविध कामांचे भूमिपूजन आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, पं.स. सभापती वजाताई भिल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जि.प.शाळा व अंगणवाडी पेव्हर ब्लॉक, अंगणवाडी वॉल कंपाऊंड, दलित वस्ती महिला शौचालय, हायमास्ट लॅम्प आदी कामांचे उद्घाटन व तांडा भिल्ल वस्तीत भुयारी गटारीचे भूमिपूजन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास कृउबा संचालक पावबा पाटील, जि.प.सदस्या संगिता भिल, माजी जि.प.सदस्य संदीप पाटील, भाजपा जिल्हा चिटणीस महेश पाटील, तालुका सरचिटणीस जिजाबराव पाटील, हिरालाल पाटील, उपसभापती श्याम आहिरे, भाजपा शहराध्यक्ष शितल देशमुख, उमेश वाल्हे, नाटेश्वर पाटील, जवखेडा सरपंच वनिता पाटील, उपसरपंच वंदना पाटील, माजी सरपंच लटा पाटील, प्रकाश पाटील, प्रभाकर पाटील, भाजप जेष्ठ कार्यकर्ते खेमचंद जैन, माजी सरपंच हंसराज पाटील, ग्रा.पं. सदस्य झुलाल पाटील, नगराज माळी, माजी सरपंच सुनिल पाटील, अनिल पाटील, भिकन पाटील, स्थानिक भाजप अध्यक्ष जिजाबराव पाटील, भाजपाचे युवा मोर्चा अध्यक्ष राकेश पाटील, दिनेश पाटील, बुधप्रमुख नगराज पाटील, भूषण जैन, अनिल पाटील तसेच गावातील जेष्ठ, श्रेष्ठ नागरीक व शेकडो भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी जि.प. सदस्य संदीप पाटील यांनी केले.