श्रीनगर-दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. कुलगाम येथील लारो परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानतंर सुरक्षा दलाने शोधमोहिम हाती घेतली होती. काल रात्रीपासून येथे चकमक सुरू होती. एका घरामध्ये दोन-तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेरलं आणि त्यानंतर चकमकीला सुरूवात झाली होती. यामध्ये सुरक्षा दलाचे दोन जवानही जखमी झाले आहे.
The exchange of fire is still underway, it started yesterday. The terrorists are unidentified so far & are inside a house now. Further details will be given after the encounter concludes: Harmeet Singh, SSP Kulgam on encounter in Kulgam's Larro area. #JammuAndKashmir pic.twitter.com/DsHAJp9JuH
— ANI (@ANI) October 21, 2018
चकमक आत्ताच संपली असून यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. मृत दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही, पण त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिली. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक निकाल घोषित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सुरक्षादल आणि दहशतवाद्यांदरम्यान ही चकमक झाली.