‘जवाब दो’ मोहिमेला सरकारकडे उत्तर देण्याचे धाडस नाही-राष्ट्रवादी

0

पुणे-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने भाजप सरकारला जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नाबाबत ५६ दिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज नवनवीन प्रश्न केले जात होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने ही मोहीम चालवली होती. मात्र राष्ट्रवादीच्या ५६ दिवसातील एकही प्रश्नाला उत्तर देण्याचे धाडस या सरकारने केले नसल्याचे आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

सरकारचे चार वर्षे पूर्ण केल्याबद्दल स्वतःचीच पाठ थोपटणाऱ्या युती सरकारमधील एकाही मंत्र्याने ५६ दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेच्या वतीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे धाडस केले नाही. एरवी सोशल मीडियावर सक्रीय असलेल्यांनी चुप्पी का साधली? असा प्रश्न राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.