जवाहरची सिंचन चळवळ पाहून विद्यार्थी झाले प्रभावित

0

धुळे । जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टने केलेली कामे ही एक ऐतिहासिक सिंचनाची कामे असून यामूळे शेतकर्यांना दिर्घकाळ फायदा होवून सिंचन चळवळीतील एक नवा यशस्वी पॅटर्न आम्हाला अभ्यासवयास मिळाला आहे. अशा प्रतिक्रीया व्यक्त करीत नाशिक येथील एमव्हीपी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रभावित झाले.दरम्यान या विद्यार्थ्यांनी सुुकवड येथे पांझरा नदीवरील फड पध्दतीचे बंधारे व पाटकालव्यांचीही पाहणी केली व माहिती जाणून घेतली.

साठवण क्षमता वाढली
जवाहर ट्रस्टच्या कामासंबधी माहिती देतांना जलतज्ञ पालनदास घोडेस्वार यांनी सांगितले कि, आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर ट्रस्टच्यामाध्यमातून जून 2016 अखेर धुळे तालुक्यातील जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टने 43 गावांमध्ये 232 बंधार्यांचे खोलीकरण व रुंदीकरण केले आहे. सदरचे काम हे 20 लक्ष 97 हजार 380घ.मी. एवढे काम झाले आहे. यामुळे जमीनीतील पाण्याची पातळी वाढून 2अब्ज 71 कोटी 60लक्ष 4 हजार लिटर एवढी पाण्याची साठवण क्षमता वाढली आहे. या परिणामी म्हणून सिंचन काम केलेल्या परीसरातील एकूण 1636 विहीरींना त्यांचा फायदा होत आहे. तसेच तालुक्यातील 18 नळ पाणी पुरवठा योजनांही त्यांचा लाभ झाला आहे. तसेच वाघी आणि कन्हेरी नदीचे पूनर्जीवनाचेही काम जवाहर ट्रस्टने केले आहे.त्याचप्रमाणे सुकवड,मोहाडी प्र.डा.,शिरडाणे,हेंकळवाडी या भागात शिवकालीन पाटकालव्यांचेही पुर्नजीवन ट्रस्टमार्फत केले आहे.

पहिल्यांदा नवा विषय मिळाला
जवाहर ट्रस्टने तालुक्यात केलेली सिंचनाची कामांमुळे आम्हाला पहिल्यांदा नवा विषय अभ्यासन्यास मिळाला आहे. ही एक ऐतिहासिक चळवळ असून याचा शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल शासनाने जवाहर ट्रस्टने केलेल्या सिंचनाच्या या प्रयोगाचे अनुकरण करणे गरजचे असून जनतेनेही या लोकचळवळीत सहभागी व्हावे या अभ्यास दौर्यात आम्हाला अतिशय उपयुक्त महिती मिळाली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या अभ्यास दौर्‍यात उपस्थित राहून आ.कुणाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. यावेळी जलतज्ञ पालनदास घोडेस्वार,प्रा.तुषार कुलकर्णी,विलास गुजर, महेंद्र पाटील,संचालक अविनाश पाटील,संचालक बापू खैरनार,आदी उपस्थित होते.

ग्रामीण जीवन आणि सिंचन पध्दत
नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी धुळे जिल्हयातील ग्रामीण जीवन आणि सिंचन पध्दत या विषयावरील अभ्यास दौर्यासाठी आले होते.यावेळी त्यांनी धुळे तालुक्यातील जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टने केलेल्या सिंचनाच्या कामांना तसेच पांझरा नदीवरील फड पध्दतीचे बंधारे आणि पाटकालव्यांच्या कामांची पहाणी केली व माहिती जाणून घेतली. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर ट्रस्टने तालुक्यात नदी नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण, दोन नद्यांचे पूर्नजीवनाची कामे तसेच सुकवड,मोहाडी प्र.डा.,शिरडाणे,हेंकळवाडी या भागात शिवकालीन पाटकालव्यांचे पुर्नजीवन ही कामे पाहून विद्यार्थी प्रभावित झाले.