जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी एप्रिलमध्ये प्रवेश परीक्षा

0

भुसावळ- 2018-19 या वर्षात पाचवीत शिकत असणार्‍या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. यंदा प्रवेश अर्ज हे पुर्णपणे ऑनलाइन पद्धतीनेच भरले जाणार असून प्रवेश अर्ज भरण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही शिवाय शाळेच्या संकेत स्थळावरून ते अपलोड करता येणार आहेत. प्रवेश अर्ज भरण्याची तारीख 22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर असून 6 एप्रिल 2019 रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्यांनी केले आहे.