जाँटी बनणार त्रिची वॉरियर्सचा ब्रँड अँबेसेडर

0

चेन्नई। दक्षिण आफ्रिका संघाचा माजी क्रिकेटपटू जाँटी र्‍होडस हा तामिळनाडू प्रिमीयर लीग या स्पर्धेत सहभागी होणार्‍या त्रिची वॉरियर्स या संघाचा मेंटॉर बनणार असल्याचे आज एका ट्विटद्वारे जाहीर करण्यात आले.

त्रिची वॉरियर्स संघाच्या ट्विटर अकाऊंटवरून ही घोषणा करण्यात आली. जाँटी ही ब्रँड अँबेसेडर आणि मेंटॉर या दोन्ही भूमिका पार पाडणार आहे. या संघाचे प्रशिक्षक तथा भारताचे माजी कसोटीपटू टिनू योहानन यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, जाँटीसारख्या महान खेळाडूपासून त्रिची संघातील खेळाडूंना चांगली प्रेरणा मिळून त्यांची कामगिरी उंचावले. खरं तर पहिल्या टप्प्यात जाँटी त्रिची वॉरियर्स या संघासोबत फक्त दोन दिवस राहणार आहे. यात तो सर्व संघानाला क्षेत्ररक्षण, फलंदाजी आणि गोलंदाजीतील बारकावे सांगणार आहे. यासोबत सामना जिंकण्यासाठीच्या महत्वाच्या टिप्सदेखील तो देणार आहे. याच्या मदतीने त्रिची संघात उत्साहाचे वारे संचारले असल्याची माहिती टिनू योहानन यांनी दिली.

अन्य दिग्गजांचाही समावेश
तामिळनाडू प्रिमीयर लीग या स्पर्धेतील बहुतांश संघांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध देशांचे दिग्गज खेळाडू येत असतात. दक्षिण आफ्रिकेचाच स्फोटक फलंदाज लान्स क्लुजनर हा ‘लायका कोवाई किंग्ज’ या संघाचा प्रशिक्षक असून तोदेखील उद्या सकाळी संघाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे. तो गेल्या मोसममध्येही या संघाचा प्रशिक्षक होता. तर श्रीलंकेचा महान स्पीनर मुथय्या मुरलीधरन ‘व्हीबी थिरूवल्लर विरन्स’ या संघाशी जुळलेला आहे. या दिग्गजांच्या सहभागाने तामिळनाडू प्रिमीयर लीगला वलय प्राप्त झाले आहे.