जागतिक अर्थव्यवस्थेत भारत ५८ व्या स्थानी

0

नवी दिल्ली- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जागतिक निर्देशांकात भारताने ५८ वे स्थान मिळविले आहे. या यादीत अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील हे स्थान आहे.

भारताच्या २०१७ पेक्षा ५ अंकांनी यात वाढ झाली आहे. जी -20 अर्थव्यवस्थेतील ही वाढ फायदेशीर असल्याचे डब्ल्यूईएफ सांगितले आहे. 140 अर्थव्यवस्थांच्या यादीत अमेरिकेनंतर अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसर्या स्थानावर सिंगापुर आणि जर्मनीचे आहे. ताज्या जागतिक स्पर्धात्मक अहवालात 62.0 गुणांसह भारत 58 व्या स्थानावर आहे. जी -20 अर्थव्यवस्थांमध्ये हा सर्वात मोठा फायदा आहे. चीन यादीत 28 व्या स्थानावर आहे.