यावल शहरातून निघणार 9 रोजी रॅली : आदिवासी चालीरीतींचे दर्शन घडणार
यावल- एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने दरवर्षी जागतिक आदिवासी अस्मिता दिन साजरा केला जातो. यंदा शहरात विविध कार्यक्रमांसह उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने प्रकल्प कार्यालयात अधिकारी, पदाधिकारी व संघटनांच्या प्रमुखांची बैठक झाली. त्यात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी अस्मिता दिन असल्याने एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयापासून आदिवासी चालीरितींच्या दर्शनासह सजीव देखावे सादर करून सवाद्य रॅली काढण्यात येते. या वर्षीच्या कार्यक्रमाच्या नियोजना संदर्भात कार्यालयात प्र्रकल्प अधिकारी आर.बी.हिवाळे यांनी बैठक घेतली.
यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रकल्पस्तरीय नियोजन आढावा समिती अध्यक्ष मीना तडवी होत्या. प्रमुख उपस्थितीत पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी, समितीचे सदस्य नादान नहारू पावरा, शांताराम भील, भरत बारेला, लोक संघर्ष मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रकाश बारेला, कादीर तडवी, हुसेन तडवी, मजिद तडवी, राजु बारेला अविनाश पवार, सुधाकर पारधी, पंडीत चव्हाण, पन्नालाल मावळे, जयदीप पारधींसह मोठ्या संख्येत आदिवासी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 9 ऑगस्ट रोजी सर्व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आदिवासी कार्यालयात एकत्र येतील व सकाळी नऊ वाजेेला पारंपारीक वाद्य व चित्ररथ, सजीव देखाव्यासह रॅली अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावरून थेट फैजपूर रस्त्यावर असलेल्या नेवे मंगल कार्यालयापर्यंत रॅली निघून तेथे समारोप होईल.
रॅलीत डीजेेवर बंदी
या नियोजन बैठकीत पोलिस निरीक्षक डी. के. परदेशी यांनी सर्व संघटनांच्या पदाधिकार्यांना डी.जे. वाद्याला बंदी असून आपण पारंपारीक वाद्य या रॅलीत वाजवू, शकतात असे सांगितले. तेव्हा सर्वांनी सुचनांचे पालन केले जाईल व कायदा व सुव्यवस्थेला तडा जाणार नाही याची प्रसंगी ग्वाही दिली
फुलां ऐवजी वृक्ष रोप देवून स्वागत
या कार्यक्रमास उपस्थित राहणार्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ न देेता वृक्ष रोप देवुन त्यांचे सवागत केले जाणार आहेे. एकुण आदिवासी अस्मिता वृक्ष संगोपातुन जोपासण्याचा संदेश या तुन दिला जाणार आहे.
एकता मंच तर्फे कार्यक्रम
शहरात 9 ऑगस्टला आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच कडून आदिवासी संस्कृती जतन व संवर्धन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साकळीत. 9 वाजेला नाजुका निवास, फैजपूर रोड येथे हा कार्यक्रम असून राज्याध्यक्ष एम. बी. तडवी, सलिम तडवी, हसीना तडवी, अमित तडवी, जे. एम. तडवी, मुबारक तडवी, समिर तडवी आदींनी आयोजन केले आहे.