जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम

0

नवापूर। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहरात विविध व भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती नवापूर तालुका आदिवासी उत्सव समितीतर्फे आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. जागतिक आदिवासी दिनानिमित्त 8 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून भव्य मोटारसायकल रॅली सुरु होणार आहे. बुधवार 9 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्यानंतर भव्य शोभायात्रेला प्रारंभ होणार असून शोभा यात्रा विविध व मुख्य मार्गावरुन जाईल. या शोभायात्रेत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात येणार आहे.

सभेत विविध विषयांवर होणार चर्चा
त्यानंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व स्व. हेमलताताई वळवी यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर वरिष्ठ महाविद्यालयाचा भव्य प्रांगणात सभेचे आयोजन करण्यात आले असून यात वैद्यकिय अधिकारी डॉ. मनोज गावीत, यमुनाबाई वळवी (उदमगडी ता. निझर जि. वापी), मंत्रालयातील निवृत्त उपसचिव सदानंद गावीत यांच्यासह सर्व पक्षीय नेतेगण मार्गदर्शन करणार आहेत. या सभेत समाज हिताचे विविध ठराव पारीत करण्यात येणार आहेत. यावेळी 20 ते 25 हजार आदिवासी बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी नगर पालिकेचे गटनेते गिरिष गावीत, पं.स.चे उपसभापती दिलीप गावीत, आर.सी.गावीत, विनय गावीत, भालचंद्र गावीत, सुनील वसावे, जालमसिंग गावीत, राँबीन नाईक, विनायक गावीत, ईश्वर गावीत, जैनु गावीत, संजय गावीत, अजय गावीत, डॉ. भानुदास गावीत, ईश्वर मावची, डि.एन.मावची, संजय मावची आदि उपस्थित होते.