जळगाव । जागतिक आदिवासी दिनानिमित्त लोंकसंघर्ष मोर्चेद्वारे कांताई सभागृहात सत्काराचा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी, आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅली काढण्यात आली. आदिवासी बांधवांनी श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून ते कांताई सभागृहापर्यंत रॅली काढली होती. या रॅलीत पारंपारिक वेशभूषा, ढोल-ताशांसह आदिवासी बांधव सहभागी झाले होते. रॅलीच्या अग्रभागी सुशोभित केलेले ट्रॅक्टर होते. या ट्रॅक्टरवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह बिरसा मुंडा, क्रांतीवीर ख्वॉज नाईक, हल्दीबाई भील, तंट्या भील, क्रांतीवीर राघोजी भांगरे आदी वीरांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या.यावेळी आदिवासी वीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
आमो आखा एक सेचा नारा
रॅलीत मुंकद सपकाळे, शंभू पाटील, फहीम पटेल, प्रकाश बारेला, किरण वाघ, अमित पानपाटील, यमुनाबाई, रैनाबाई प्रकाश बारेला, जशा बारेला, फुलसिंग बारेला, लिलाबाई बारेला आदींसह हजारो आदिवासीबांधव सहभाग झाले होते. यात जिल्ह्यातून वैनापूर, परजाणा, देवझरी, खॉजा पाजा, उसमळी, लंगडा आंबा, पाल यासह यावल, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर आदी ठिकांणाहून तसेच नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधव सहभागी झाले होते .रॅलीची सुरूवात श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातून झाली. यानंतर रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, नेहरू पुतळा, चित्रा चौक, भजे गल्ली मार्गांने रॅलीची सांगता कांताई सभागृहात करण्यात आली. या रॅलीत पारंपरिक वेशभूषा परिधान करून तसेच ढोल ,डफच्या तालावर नृत्य करीत संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. यात रॅलीतील आदिवासी नृत्य, शिबली नृत्य, पावरा नृत्य, आदिवासी गीते सादर करण्यात आली. तसेच आमो आखा एक सेचा नारा दिला.
यांना करण्यात आले सन्मानित
रॅली कांताई सभागृहात आल्यानंतर आदिवासी मित्र पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांना धरती आबा बिरसा मुंडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यासोबतच नंदूरबारचे जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांना क्रांतिवीर ख्वाजा नाईक पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी मंत्री पद्माकर वळवी यांना आदिवासी रत्न पुरस्कार देण्यात आला. माजी आमदार शिरीष चौधरी यांना वीर तंट्या भील पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तर आदिवासी मित्र पुरस्कार साक्री येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विजया अहिरराव व सिनेकलावंत प्रतिभा शर्मा यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर सिनेकलावंत यशपाल शर्मा, विशेष उपस्थिती विभागीय आयुक्त महेश झगडे, यांची होती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जैन उद्योग समुहाचे चेअरमन अशोक जैन होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अरूणा चौधरी, प्रतिभा शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रेय कराळे प्रकाश बारेला, यमुनाबाई, मुकुंद सपकाळे, फहीम पटेल आदी उपस्थित होते.
तिर रोवून उद्घाटन
कार्यक्रमाचे उद्घाटन आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. यात सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर ठेवण्यात आलेल्या भांड्यात तिर रोवून पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर उद्घाटनपर भाषणात यशपाल शर्मा यांनी लोकसंघर्ष मोर्चोंच्या प्रतिभा शिंदे यांचे कौतुक केले. यात शर्मा यांनी सांगितले की, झीलाबाईवर आमो आखा एक से फिल्म बनवित असतांना प्रतिभा शर्मा यांना प्रतिभा शिंदे यांची मोलाची साथ लाभल्याचे सांगितले. तसेच हा चित्रपट जागतिकस्तराव पोहचेल असा अशावाद व्यक्त केला. याचित्रपटातून भारतीय संस्थांना आदिवासींसाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल असे सांगितले. यानंतर त्यांनी वक्त की मांग है, अंगार लिखो गितो में… ही कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
प्रतिभा शिंदे यांचे केले कौंतुक
प्रवीण परदेशी यांनी पुरस्काराला उत्तर देतांना त्यांनी केलेले काम हे त्यांच्या कर्तव्याचा भाग होता असे विनम्रपणे नमुद करत प्रतिभा शिंदे यांनी दिलेला पुरस्कार स्वीकारत असल्याचे सांगितले. यातून प्रतिभा शिंदे यांचे काम पहाण्यास मिळाल्याचे परदेशी यांनी सांगितले. आदिवासी मागील 5 हजार वर्षांपासून पर्यांवरणाचे संरक्षण केल्याने आधुनिक जीवन पद्धती उभी राहिल्याचे सांगितले. सामुहिक जागा ही आदिवासींचीच असून ती त्यांनी सांभाळावी व उत्पन्न मिळावावे असे आवाहन केले. 2013 साली सुरू केलेले काम आज प्रत्यक्ष लोकसंघर्ष समितीच्या कामातून पहात असल्याचे परदेशी यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ग्राम परिवर्तन फाऊंडेशन राबविण्यात येत असून याअंतर्गत यावल तालुक्यातील 5 गावांचा आराखडा तयार करून पाठविण्याच्या सूचना अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी यांनी दिल्या आहेत.
शेतीतील नवतंत्र लवकरच
कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आदिवासींसाठी भरीव कार्य करण्याची संकल्पना मोठे भाऊंची होती अशी माहिती दिली. शासन, आदिवासी बांधव, जैन उद्योग समुह या त्रिकोणातून आदिवासींचा विकास साधला जाईल अशी ग्वाही अशोक जैन यांनी दिली. आदिवासींचा विकास करून त्यांना मुख्य प्रवहात आणणार असल्याचे स्पष्ट मत जैन यांनी मांडले. आदिवासींच्या विकासासाठी ब्लु प्रिंट तयार असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपस्थितांना दिली.
उपाशी रहा पण जमीन विकु नका
आदीवासी बांधवांनी जमिनीचे संरक्षण केले पाहीजे़ उपाशी रहा पण जमिन विकू नका संषर्घ करा, अन्यथा आदीवासी हिंसाचारी बनु शकतो़ भारत देशात कुठेही गेलात तर नक्षलवाद फोफावत आहे़ मात्र सातपुडा रांगेतील आदीवासी नक्षलवाद हिसाचाराच्या मार्गाला जात नाहीते़ हिंसेच्या मार्गाने विकास होत नाही़ सर्वांना सोबत घेवून काम करू शकतो गांधीवाद, अहिंसावाद मुळे विकास शक्य आहे़ जंगल, जमिनीचे संरक्षण झाले पाहीजे़ तरच माणुस जगेल असे श्री वळवी यांनी आयोजीत कार्यक्रमा प्रसंगीत सांगीतले़ तसेच गौगवा करण्यापेक्षा एका वर्षात नेकेड रोप तयार करणे चांगला उपक्रम आहे़ 15 वर्षांत शंभर क्विंटल बांबुची जी जमा केली़ गुजरात, नाशिक येथून बी आणले होते़ यातून करोडोने झाले वाटले़ झाडे प्लास्टीक पिशवीत दिले जाते़ यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते़ यासाठी पिशव्यांची झाडे लावु नये़ बांबु, साग, निलगीरी ही झाडे चांगली असतात़ वन पट्ट्यात शेतकरी जमिनीवर झाडे लावे चांगला उपक्रम असुन यास माझा पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगीतले़