जळगाव : लोकसंघर्ष मोर्चातर्फे कांताई सभागृहात ध्येयवेडे अधिकारी व कार्यकर्त्यांचा गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले. अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांना धरती आबा बिरसा मुंडा पुरस्कार, नंदूरबारचे जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांना क्रांतिवीर ख्वाजा नाईक, माजी मंत्री पद्माकर वळवी यांना आदिवासी रत्न, माजी आमदार शिरीष चौधरी यांना वीर तंट्या भील, आदिवासी मित्र पुरस्कार साक्री येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विजया अहिरराव व सिनेकलावंत प्रतिभा शर्मा यांना प्रदान करण्यात आला.
मी केलेले काम हे त्यांच्या कर्तव्याचा भाग होता असे विनम्रपणे नमुद करत प्रतिभा शिंदे यांनी दिलेला पुरस्कार स्वीकारत असल्याचे सांगितले. यातून प्रतिभा शिंदे यांचे काम पहाण्यास मिळाले. आदिवासींनी मागील 5 हजार वर्षांपासून पर्यांवरणाचे संरक्षण केल्याने आधुनिक जीवन पद्धती उभी राहिल्याचे सांगितले. सामुहिक जागा ही आदिवासींचीच असून ती त्यांनी सांभाळावी व उत्पन्न मिळवावे 2013 साली सुरू केलेले काम आज प्रत्यक्ष लोकसंघर्ष समितीच्या कामातून पहात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ग्राम परिवर्तन फाऊंडेशन राबविण्यात येत असून याअंतर्गत यावल तालुक्यातील 5 गावांचा आराखडा तयार करून पाठविण्याबात सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रविण परदेशी, अप्पर मुख्य सचिव
आदीवासी बांधवांनी जमिनीचे संरक्षण केले पाहीजे़ उपाशी रहा पण जमिन विकू नका संषर्घ करा, अन्यथा आदीवासी हिंसाचारी बनु शकतो़ भारत देशात नक्षलवाद फोफावत आहे़ मात्र सातपुडा रांगेतील आदीवासी नक्षलवाद हिसाचाराच्या मार्गाला जात नाहीते़ हिंसेच्या मार्गाने विकास होत नाही़ गांधीवाद, अहिंसावादामुळे विकास शक्य आहे़ जंगल, जमिनीचे संरक्षण झाले पाहीजे़ तरच माणुस जगेल तसेच गवगवा करण्यापेक्षा एका वर्षात नेकेड रोप तयार करणे चांगला उपक्रम आहे़ 15 वर्षांत शंभर क्विंटल बांबुची बी जमा केली़ गुजरात, नाशिक येथून बी आणले होते़ यातून करोडोने झाडे वाटले़ झाडे प्लास्टीक पिशवीत दिले जाते़ यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते़ पिशव्यांची झाडे लावु नये़
पद्माकर वळवी, माजी मंत्री
आदिवासींसाठी भरीव कार्य करण्याची संकल्पना मोठे भाऊंची होती शासन, आदिवासी बांधव, जैन उद्योग समुह या त्रिकोणातून आदिवासींचा विकास साधला जाईल आदिवासींचा विकास करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणार असल्याचे स्पष्ट मत जैन यांनी मांडले. आदिवासींच्या विकासासाठी ब्लु प्रिंट तयार असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शासन, आदिवासी बांधव, जैन उद्योग समुह या त्रिकोणातून आदिवासींचा विकास साधला जाईल, आदिवासींच्या जीवनमान उंचविण्याकडे लक्ष देणार, प्रतिभा शिंदे यांनी आदिवासींसाठी केलेले कार्य महत्वाचे असून त्यांच्या सहकार्यांने आदिवासींच्या विकासात मदत करणार
अशोक जैन, जैन उद्योग समुह
सातपुड्याच्या दर्या-खोर्यात आदिवासींच्या न्याय हक्कासाठी आजीवन लढणार्या झीलाबाईवर आमो आखा एक से फिल्म बनवित असतांना प्रतिभा शर्मा यांना प्रतिभा शिंदे यांची मोलाची साथ लाभली. तसेच हा चित्रपट जागतिकस्तरावर पोहचेल असा आशावाद मला वाटतो आहे. याचित्रपटातून भारतीय संस्थांना आदिवासींसाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल वक्त की मांग है, अंगार लिखो गितो में… या गीतातील अंतःप्रेरणा महत्वाची ठरते.
यशपाल शर्मा, सिने अभिनेते
लोकसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून गेेले 22 वर्षे अविरतपणे आदिवासींच्या उत्थानासाठी अहिंसक मार्गाने प्रशासनाशी सुसंवाद साधुन, प्रकल्पात्मक, रचनात्मक आणि आंदोलनात्मक पातळीवर सातत्याने झटते आहे. तळागाळतल्या शेवटच्या आदिवासी पाड्यातल्या माणसासाठी विकासाचा दिवा पेटवितांना लागणारे मोलाचे सहकार्य व्यासपीठावर उपस्थित या मान्यवरांच्यारुपाने वेळोवेळी लाभले आहे. सामाजिक, आर्थिक, मानसिक पातळीवर ते आदिवासीमय झाले याचा संघटनेला सार्थ अभिमान आहे.
प्रतिभा शिंदे, लोकसंघर्ष मोर्चा
विविध आदिवासी नृत्यांच्या तालावर थिरकली पाऊले : आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅलीत यावेळी आदिवासी वीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आमो आखा एक से चा नारा ः रॅलीत मुंकद सपकाळे, शंभू पाटील, फहीम पटेल, प्रकाश बारेला, किरण वाघ, अमित पानपाटील, यमुनाबाई, रैनाबाई प्रकाश बारेला, जशा बारेला, फुलसिंग बारेला, लिलाबाई बारेला यांचेसह पारंपरिक वेशभूषा परिधान करून तसेच ढोल ,डफच्या तालावर नृत्य करीत संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. यात रॅलीतील आदिवासी नृत्य, शिबली नृत्य, पावरा नृत्य, आदिवासी गीते सादर करण्यात आली. यात जिल्ह्यातून वैनापूर, परजाणा, देवझरी, खॉजा पाजा, उसमळी, लंगडा आंबा, पाल यासह यावल, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर आदी ठिकांणाहून तसेच नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधव सहभागी झाले होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अरूणा चौधरी, प्रतिभा शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रेय कराळे प्रकाश बारेला, यमुनाबाई, मुकुंद सपकाळे, फहीम पटेल आदी उपस्थित होते.