जागतिक कॅरम स्पर्धेसाठी आयशा मोहम्मद रवाना

0
जैन स्पोर्ट्स अकादमीतर्फे मान्यवरांकडून स्पर्धेसाठी शुभेच्छासह निरोप
जळगाव । साऊथ कोरिया येथे सुरु होणार्‍या 5 व्या जागतिक कॅरम स्पर्धेसाठी भारतातर्फे जैन इरीगेशनची खेळाडू आयशा मोहम्मद हिची निवड झाली असून ती आज सोमवारी दिल्लीकेडे रवाना झाली. तत्पुर्वी तिला जैन स्पोर्ट्स अकादमीचे खेळाडू, प्रशिक्षक, महिला मंडल यांच्या वतीने कांताई सभागृहात निरोप व शुभेच्या देण्यात आल्या. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संघपती दलीचंद जैन, आमदार चंद्रकांत सोनवणे, जेष्ठ विधि तज्ञ अ‍ॅड. सुशील अत्रे आदींची उपस्थिती होती.
दुसर्‍यांदा महाराष्ट्रची प्रतिनिधित्त्व आयशाची निवड
जैन स्पोर्ट्सचे क्रीडा समन्वयक फारूख शेख यांनी आयशाची माहिती देतांना सांगितले की, आयशाने 45 वेळा राष्ट्रीय स्पर्धेत, दोन वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत, एक वेळा एशियन स्पर्धेत व 2007च्या वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झाली असून आता 26 ऑगस्ट पासून सुरु होणार्‍या 5व्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी साऊथ कोरियाला जात असून त्या ठिकाणी 18 देशांचा समावेश असल्याची माहिती दिली. दुसर्‍यांदा महाराष्ट्रची प्रतिनिधित्त्व करणारी आयशा ही एकमेव खेळाडू असून यापूर्वी महाराष्ट्रातील संगीता चांदोरकर व अनुपमा केदार यांची निवड झालेली होती. मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देवून सत्कार करण्यात आला.
मित्र परिवारातर्फे आयशाचा सत्कार
महिला मंडळाच्या राजी नायर, सरिता खाचने, कमलेश शर्मा, विजया पांडे यांनी तर महिला हॉकी तर्फे प्रो डॉ अनिता कोल्हे,माधुरी भारुडे, निशा कोंडालकर, ममता बर्‍हाटे, गायत्री साळुंखे, किर्ती पाटील, आशुतोष शुक्ल, किशोर मराठे, गौरव ठाकुर, अरविंद देशपांडे, अब्दुल मोहसिन, लियाकत अली, अजित घारगे, वाल्मीक पाटिल, संजय पाटिल, सय्यद बादशाह, प्रवीण ठाकरे यांनी देखील सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सरिता खाचने यांनी तर आभार अरविंद देशपांडे यांनी मानले.