जळगाव। शहरातील ‘पाणी अडवा हरित क्रांती घडवा, पाणी वाचवा, दुष्काळ हटवा, जल है तो कल है’ अशा सामाजिक जल सर्वधनाच्या घोषणांमधून पाणी बचतीचा संदेश देत आज सकाळी जळगावकर वॉटर रन अर्थात जलदौड मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले. जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनातील विविध विभागातील अधिकारी शहरातील दिग्गज राजकारणी मंडळी सहभागी झाले होते. जळगाववासियांना खर्या अर्थाने पाण्याचे महत्व मोठ्या प्रमाणात असल्याचे आयोजित जलदौड मध्ये दर्शन झाले आहे. 16 ते 22 मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह होणार आहे.
जिल्हाधिकार्यांसह मान्यवर उपस्थित
वॉटर रन अर्थात जल दौड आयोजित करण्यात आली होती. या दौड मध्ये जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापौर नितीन लढ्ढा, आमदार चंदु पटेल, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक व्हि.एम राजपुत, जळगाव पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता सु.प्र. सैंदाणसिंग, कार्यकारी अभियंता संजीव चोपडे, कार्यकारी अभियंता आर.एस. विसवे, एस.जे. माने, टी.पी. चिनावलकर, एस. पी. काळे, पी.आर. मोरे, आर. जी. पाटील, एस. सी अहिरे, एस.एफ. गावित, जी.एम फाऊंडेशनचे अरविंद देशमुख, पितांबर भावसार, नीर फाऊंडेशनचे सागर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
संगीताच्या तालावर रोड मार्च
काव्य रत्नावली चौकातून या दौडचा प्रारंभ झाला. यावेळी सुरुवातीला सामुहिक जलप्रतिज्ञा घेण्यात आली. त्यानंतर ग्लॅडीएटर ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी संगिताच्या तालावर रोड मार्च केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जल दौडची सुरुवात झाली. या दौड मध्ये सर्व मान्यवर सहभागी झाले. काव्य रत्नावली चौकातून आकाशवाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे, स्वातंत्र्य चौक, स्टेडीयम मार्गे ही दौड शिवतीर्थ मैदानावर आली आणि तेथे या दौडचा समारोप करण्यात आला. तेथे मानयवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली.या दौड मध्ये जैन इरीगेशन, जैन स्पोर्टस, जळगाव रनर्स ग्रुप, युवा शक्ती ग्रुप, विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.