जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

0

शिरपूर । 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खान्देश पर्यावरण संरक्षण मंडळातर्फे खर्दे ग्रामपंचायत शिरपुर येथे स्वछता अभियाने वृक्षारोपण करण्यात आले. सुरवातीस दत्त मंदीर परीसर, श्रीकृष्ण मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, स्वच्छतेचे महत्व ग्रामस्थांना सांगण्यात आले. सरपंच भरत गुजर, उपसरपंच प्रकाश गुजर, वैद्यकीय अधिकारी मनोज पाटील सामाजिक वनिकरणाचे वनपाल एन.एन.वाघ यांच्याहस्ते वृक्षरोपण करण्यात आले. या कार्यक्रमात खान्देश पर्यावरण संरक्षण मंडळाचे अध्यक्ष हेमंत शेटे, कार्यध्यक्ष जितेंद्र शेटे, उपाध्यक्ष सतीश मिस्री, सदस्य मयूर बोरसे, भरत भोई, योगराज बागुल, हेमंत शिरसाठ, विजेंद्र जाधव, भरत कोळी, सचिन पाटिल, सुनील पावरा, मनीष जाट आदी उपस्थित होते.