जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर

0

जळगाव । जागतिक रेडक्रॉस दिवस 8 मे रोजी संपुर्ण जगभर साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगावच्यावतीने विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. रेडक्रॉसचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने जळगाव शहरातील सेवाकलाविष्कार या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सेवा आणि कलेचा अतिशय सुरेश भव्य संगम जळगावकरांना अनुभवायला मिळणार आहे. या उपक्रमासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ चित्रकार, कलावंत, चित्रकलाशिक्षक व कला प्रेमींचे सक्रिय सहकार्य मिळणार आहे. या शिवाय इंडियन रेडक्रॉस सोसायटी पुरस्कृत सर्व जेनेरिक दिर्घायु दवाखान्यात 8 मे रोजी विनामुल्य आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत ही तपासणी करण्यात येईल. फुलफगर फार्मा, विसनजी नगर, पुष्कराज मेडिसीन, नवजीवन सुपर शॉपी शेजारी मानराज पार्क, रेवती मेडिको, शनि मंदिरासमोर केली.