जळगाव । दरवर्षी 8 मे हा दिवस जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त रेडक्रॉसच्या ध्वजारोहण जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घटनानंतर गनी मेमन यांनी प्रस्तावना केली. जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त रेडक्रॉस पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, कर्मचारीवृंद, स्वयंसेवक, रक्तपेढीस वेळोवेळी येऊन रक्तदान करणारे रक्तदाते, रक्तदान शिबीर आयोजकांंना शुभेच्छा दिल्या. स्क्रीनिंगची सुविधा इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगाव व जळगाव रोटरी वेस्ट यांचे सयुंक्त विद्यमाने व बायोरॅड लॅबोरेटरिज इंडिया प्रा. लिमिटेड यांचे प्रायोजकत्वाने उपलब्ध करण्यात आलेली होती. रेडक्रॉस रक्तपेढीमध्ये एकूण 75 जणांचे स्क्रीनिंग करण्यात आले. एकूण 300 महिला व पुरूषांचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. थँलेसेमिया सिकल सेल्स बाल रुग्णांना पोषक आहाराचे वाटपही करण्यात आले.
सुमधुर गीतांचा कार्यक्रम
या रेडक्रॉसच्या थीम वर आधारित मुस्कुराती जिंदंगी संगीतमय सुमधुर गीतांचा कार्यक्रम जागतिक ख्यातीचे संगीतकार म्युझिक स्टेशनचे अप्पा नेवे यांनी संगीत देऊन सौ. उज्वला वर्मा, डॉ.दीपक अटल, डॉ. राजेश पाटील, डॉ. राजेश जैन, डॉ. अभय गुजराथी, डॉ. विद्याधर दातार, डॉ. रणजीत चव्हाण, डॉ.अमरेलीवाला डॉ. जयंती चौधरी, अप्पा नेवे, डॉ. सिद्धीका मेमन, कॅप्टन मोहन कुलकर्णी, लक्ष्मण तिवारी इत्यादि अदाकरांकडून सादरीकरण केले, राष्ट्रगीताने कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, कोषाध्यक्ष सतिष चरखा, रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, सचिव अनिल कांकरीया, डॉ. विजय चौधरी, अशोक जैन, पुष्पाताई भंडारी, डॉ. रेखा महाजन, रोटरी जळगाव वेस्टचे अॅड. सूरज जहांगीर, कृष्णा कुमार वाणी, दिलीप चौबे, डॉ. रवी महाजन, श्री. हर्षदभाई जोशी, जैन इर्रीगेशेन, झोनल रेल्वे ट्रेनिंग इंस्टीट्यूट, श्री बैठक, आर्ट ऑफ लिव्हिंग, लोक टि.व्ही.चे कमलाकर वाणी व शांताताई वाणी, संत निरंकारी मंडळ, तेरा पंथ परिवार, अनिरुद्ध उपासना केंद्र, श्री.हरी, स्वराज गृप पाळधी, राजकुमार वाणी, डॉ. प्रकाश जैन, डॉ. प्रकाश संघवी, डॉ. अनिल चौधरी, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी, उज्वला वर्मा, रक्तदान शिबीर आयोजक, रक्तदाते, स्वयंसेवक, देणगीदाते, रेडक्रॉसवर प्रेम करणारे अतिथी, रेडक्रॉस कर्मचारी वृंद यांचे परिवारातील सदस्य व जळगावकर नागरिक उपस्थित होते.
5 ते 25 वर्षे वरोगटाला लाभ
डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी चेअरमन रक्तपेढी यांनी थँलेसीमिया मुलांचे परिवारातील सदस्यांचे जसे रक्ताच्या नात्यातले भाऊ बहीण 5 ते 25 वर्ष वयोगटातील यांचे थँलेसेमिया स्क्रीनिंग तपासणी करणार आहोत, त्यामुळे थँलेसेमिया मायनरची ओळख होईल, भावी साथीदाराचीही थँलेसेमिया स्क्रीनिंग केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतल्यास, भविष्यात खांन्देशातील मुलांना थँलेसेमिया मेजर होणार नाही. थँलेसेमिया मुक्त करण्याचा हा प्रयत्न आहे.