नवी दिल्ली । नुकतीच पॅरिस येथे जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा पार पडली. 24 पहिलवानांचा समावेश असलेल्या भारतीय पथकाची या स्पर्धेत पदकांची पाटी कोरीच राहिली. भारताच्या या दारुण अपयशाबद्दल बोलताना गीता फोगट म्हणाली पुरेशा सरावाअभावी भारतीय पहिलवानांना पदकापर्यंत मजल मारता आलेली नाही. गीताने तक्रार केली की, स्पर्धा स्थळापासून 250 ते 300 कि.मी. लांब असणार्या एका स्थानिक क्लबमध्ये भारतीय पेहलवानांच्या सरावाची सोय करण्यात आली होती. त्या क्लबमध्ये चांगल्या सोयीसुविधा नव्हत्या. जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सर्वात कठिण आणि आव्हानत्मक स्पर्धा आहे. या स्पर्धेत पदक मिळवणे फारच कठीण असतं, ऑलिम्पिकपेक्षा या स्पर्धेत पदक मिळवणे कठीण आहे. अशात जर कुणी पूर्णपणे तयारी केलेली नसेल तर पदक मिळवणे सोपे नाही.
गीता म्हणाली की, मला विनेश(फोगाट) आणि अन्य कुस्तीपटूंनी सांगितलं की, स्पर्धेसाठी 15 दिवसांआधी पॅरीसला पोहोचल्यावर त्यांनी सरावासाठी कोणत्याच सुविधा पुरवल्या नव्हत्या. इतकेच काय, तर आयोजकांनी सरावासाठी दुसरा पहिलवानसुद्धा उपलब्ध करून दिला नाही, कारण दुसर्या देशाचा एकही पहिलवानतिथे पोहोचला नाही. मला नाही माहीत की या दोष भारतीय कुस्ती महासंघावर लावला जावा की, पॅरिसमधील आयोजकांवर पण हे दुर्भाग्यपूर्ण आहे की, कुस्तीपटूं स्पर्धेपूर्वी सराव करू शकले नाहीत ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती साक्षी मलिक ही जागतिक कुस्ती स्पर्धेच्या सुरूवातीलाच बाहेर झाली. तर विनेश फोगाट सुद्धा लवकरच बाहेर झाला. साक्षीला जर्मनीच्या लुईसानीमेस्चने हरवले.. तर दोनदा ज्यूनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजेता ठरलेला अमेरिकेच्या विक्टोरिया एंथनीने विनेश फोगाटला मात दिली.